Aditya Thackeray : हे सरकार फक्त 6-8 महिने, नोव्हेंबरला मविआचं सरकार सत्तेत आणायचंय; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
मुंबई : महायुतीचं सरकार फक्त सहा महिने आहे, नोव्हेंबरमध्ये आपल्याला मविआ सरकार बसवायचं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी रणशिंग फुंकलं आहे. आपण कुठून सुरू केलं, भाजपनं कुठून केलं. ते एवढे असून नऊ वर आहेत. आपले इतके पळून गेले तरी, आपण नऊ आहोत. उत्तर पश्चिमही जागा आपण जिंकणार आणि दहा जागा होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. एक अकेला चालत नाही, देशाने सांगितले. जे दोनसोबत गेलेत, ते आपल्याला माहित आहेत कोणत्या स्थिती गेले. अरविंद सावंत, तुम्ही काहीच दिवस विरोधी बाकवर आहे, असंही आदित्य ठाकरेंनी मुंबई येथील भाषणावेळी सांगितलं.
हे सरकार फक्त सहा ते आठ महिने
आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, हे सरकार फक्त सहा ते आठ महिने आहे. मिंद्ये सरकारने घोळ केला आहे, हे ज्यांना-ज्यांना वाटतंय ते बाहेर पडतील, महाराष्ट्रप्रेमी बाहेर पडतील. अनेक खासदार बाहेर पडतील. जे दोन मित्र पक्ष आहेत त्यांना सांगतो, स्पीकर तुमचा बनवा, नाहीतर भाजपचा स्पीकर झाल्यास पहिला तुमचा पक्ष फोडतील. राज्यातील मिंधे गँग, भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अनेक जण बाहेर पडतील. जे गद्दार आहेत, पक्ष चोर आहेत त्यांना आम्ही पुन्हा घेणार नाही. भाजप हा महाराष्ट्र द्रोही पक्ष आहे. आमदारांची संख्या जास्तीत जास्त असेल, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राने दाखवलं मस्ती, हुकूमशाही चालणार नाही
सिनेटमध्ये आपण एकटे लढायचे ठरवले, त्यात दहा पैकी आठ सिट जिंकलो. 2016 ला आपण दहा पैकी दहा सिट जिंकलो. लोकसभेत आपण पाहिले की मतदारांनी कौल दाखवला. मला एकटा पुढे जायचं नाहीय, मला सर्व तरुणांना सोबत घेऊन जायचे आहे. महाराष्ट्राने दाखवले मस्ती, हुकूमशाही चालणार नाही. भाजपवाले छाती फुलवतात, ती टाचणीने फोडता येते, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
या देशात हुकूमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, अमोल कीर्तीकर यांचे निवडणूक बघा, यंत्रणेचा गैरवापर केला. भाजपच्या माजी मंत्रीने सांगितलं, जे भाजपच्या मनात आहे, सिंगल पार्टी रूल आणायचे, संविधान भाजप बदलायचं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, 400 पार आम्हाला हवं आहे, कारण 400 पार झालं तर आम्हाला संविधान बदलायचं आहे. पण याचं संविधानाने इथे प्रत्येकाला आवाज दिलेला आहे. आपण केंद्र सरकारला दाखवलंय, या देशात कुणाची मस्ती चालत नाही. हुकूमशाही चालत नाही, इथे लोकशाही चालते.
नोव्हेंबरला आपल्याला पुन्हा सरकार बसवायचं
ही निवडणूक आपण जिंकणार ही खात्री आहे. ही निवडणूक नांदी आहे. ही निवडणूक सुरुवात आहे, या निवडणुकीनंतर आपल्याला हेच वातावरण दिसणार आहे. नोव्हेंबरला आपल्याला पुन्हा सरकार बसवायचं, म्हणजे बसवायचंच आहे. त्या सरकारमध्ये या दोन उमेदवारांची गरज असल्यामुळे काम आतापासून सुरु करायचं आहे.
[embedded content]
महत्त्वाच्या इतर बातम्या :
अधिक पाहा..