Ajit Pawar : अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या बैठकीत कार्यकर्त्याचा गोंधळ

Ajit Pawar : अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या बैठकीत कार्यकर्त्याचा गोंधळ धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे, अजित पवार गटातील मंत्री अनिल यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमातच पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले आहे, कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज नाराज झाले व त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे, कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती, आणि या दरम्यानच हा सर्व गोंधळ झाल्याचे बघावयास मिळाले आहे.