Amol Kirtikar Vs Ravindra Waikar : वायकरांची उत्तर पश्चिम मुंबई  मतदारसंघात 48 मतांनी मारली बाजी

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar : वायकरांची उत्तर पश्चिम मुंबई  मतदारसंघात 48 मतांनी मारली बाजी
राज्यातला सर्वात थरारक आणि धक्कादायक निकाल असं वर्णन उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालाचं केलं जातंय. शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांनी या मतदारसंघात अवघ्या ४८ मतांनी बाजी मारली. फेरमतमोजणीत रवींद्र वायकर विजयी झाले. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांचा पराभव झाला. अमोल कीर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेऱ्या आणि टपाली पात्र पत्रिकांच्या निकालानंतर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अपात्र टपाली पत्रिकांची पडताळणी करण्यात आली. अमोल गाजनान कीर्तिकरांना 4 लाख 52 हजार 596 मतं मिळाली. तर, रवींद्र वायकरांना 4 लाख 52 हजार 644 मतं मिळाली. अखेर रविंद्र वायकरांचा 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *