Bachchu Kadu : आंदोलन मतदानातून करा, निर्यात बंदी तर थेट मताची बंदी; बच्चू कडूंचा शेतकऱ्यांना सल्ला
आंदोलन करायचं असेल तर ते मतदानातून करायला पाहिजे, एक मत जर बदलले तर हे सगळे तुमच्या पायावर मस्तक ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. तसंच निर्यात बंदी, मताची बंदी असं उद्यापासून तुम्ही तुमच्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे, असंही आवाहनही बच्चू कडू यांनी केलं. ते नाशिकच्या चांदवड इथे द्राक्ष आणि कांदा परिषद शेतकरी मेळाव्यात बोलत होते. द्राक्षाचं नुकसान आणि कांदाप्रश्नावर सरकारने तोडगा काढावा, असंही बच्चू कडू म्हणाले.