Baramati Crime: देवदर्शनावरुन परतल्यानंतर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य पाहून मुलं हादरली, बारामतीमध्ये दाम्पत्याला संपवलं

Spread the love

बारामती: बारामती शहरातील कसबा परिसरात एका इमारतीमध्ये पती-पत्नीचा भर दिवसा  खून झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. खत्री पवार एन्क्लेव्ह असे या इमारतीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार सचिन वाघोलीकर आणि सारिका  वाघोलीकर असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. (Baramati Murder Case) 

या दोघांच्या शरीरावर वार केल्याच्या खुणा आहेत. या दोघांच्याही हाताची नस कापल्याचे दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस आरोपीचा शोध घेण्यात यशस्वी ठरले आहे. ही घटना घडली त्यावेळी वाघोलीकर दाम्पत्याची मुले कण्हेरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. मुले परत आल्यानंतर त्यांच्या घराला बाहेरुन कडी लावली होती. मुलांनी कडी काढून दरवाजा उघडल्यानंतर सचिन वाघोलीकर आणि सारिक वाघोलीकर यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.

तसेच बेडरुममधील कपाट, दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. हा खून आर्थिक देवाण घेवाणीतून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून पुढील शोध सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे. 

आणखी वाचा

नशेत असलेल्या मानलेल्या बहिणीवर अत्याचार केल्याने तरुणाचा खून; हिंजवडीतील थरारक घटना

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *