Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

ईव्हीएम…प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी ईव्हीएमवर सर्वाधिक चर्चा होतेय..या चर्चेला अंत आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय.ईव्हीएम हॅक होतात की नाही या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळणं कठीण बनलंय. कारण काँग्रेस सत्तेत असताना भाजप नेते अडवाणींनी २००९ साली ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त करुन त्याचा वापर थांबवला पाहिजे अशी मागणी केली होती. काँग्रेसनं ती फेटाळून लावली. आज काँग्रेस आणि विरोधातले इतर पक्ष अडवाणींसारखीच मागणी करतेय आणि भाजपचे नेते ती फेटाळून लावतायत. हा सारा संशयकल्लोळ असताना एक्सचा मालक एलन मस्कनं या वादात उडी घेतलीय. अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी प्युअर्टो रिकोमधल्या निवडणुकांसंबंधी एक ट्विट केलंय. काय आहे ते ट्विट बघा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *