Gokhale Bridge : पश्चिम उपनगरांसाठी मोठा दिलासा, गोखले पुलाचं 25 एप्रिलला लोकार्पण होणार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मोठी घोषणा
मुंबई : अंधेरीमधील (Andheri) गोखले पुलाचं 25 एप्रिल रोजी लोकार्पण होणार असल्याची घोषणा मुंबई महानगरपालिका (Mumbai) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केलीये. मागील अनेक महिन्यांपासून गोखले पुलाचं (Gokhale Bridge) काम सुरु होतं. अंधेरी पूर्व-पश्चिमला जोडणारा हा गोखले पूल आहे. गोखले पुलाचं काम हाती घेण्यात आल्यापासून अंधेरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. पण गोखले पुलाचे आता लोकार्पण होणार असून पश्चिम उपनगरांतीव वासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचे मागील अनेक महिन्यांपासून काम सुरु आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं काम सुरु होतं. नोव्हेंबर 2022 पासून गोखले पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.जून महिन्याच्या अखेरीस गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका (BMC) प्रयत्नशील होती. पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने कामात विलंब झाला असल्याचा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कामाला संपाचा फटका
रेल्वेच्या भागात असलेल्या पुलाच्या डिझाईनला रेल्वेने 2 फेब्रुवारी रोजी मंजुरी दिली आणि रेल्वेच्या भागामध्ये स्टील गर्डरसाठी ऑर्डर दिली. या विशेष स्टील उपकरणासाठी फक्त 2 उत्पादक आहेत. यामध्ये जिंदालचे एक प्लांट होते. तर सेलचे 7 प्लांट होते. मात्र सेलच्या रुरकी येथील प्लांटमधील संपामुळे अनिश्चित काळासाठी विलंब झाला आणि SAIL डिलीव्हरीसाठी तारीख निश्चित करू शकली नाही. त्यानंतर गोखले पुलाच्या कामाला विलंब होत गेला.
डिसेंबर 2023 पर्यंत पूल सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न होता
याआधी 2023 मे किंवा जून अखेरीस म्हणजेच पावसाळच्या आधी हे काम पूर्ण करून गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्यात येणार होत्या. तर संपूर्णपणे गोखले पूल हा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न होता. 7 नोव्हेंबर 2022 पासून गोखले पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर केलं जातं होतं.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..