Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर : 31 August 2024

Spread the love

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून राजकारण, महाराष्ट्राला असं राजकारण आवडत नाही, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया.      

माजी खासदार विनायक राऊतांनी केली पंतप्रधानांकडे नारायण राणेंची तक्रार, राणेंच्या धमकावणीच्या भाषेची मोदींकडे पत्राद्वारे तक्रार.

सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरण, चेतन पाटीलला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, 

लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात जातायत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, फडणवीसांचं बहीणींना आश्वासन.

लाडकी बहीण योजनेद्वारे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळणार, महायुतीचं सरकार आलं तर पुढचे पाच वर्ष ही योजना सुरुच राहील असा शब्द देतो, अजित पवारांचं वक्तव्य. 

चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन, मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा सहभाग. 

गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मुंबईकरांची गर्दी, लालबाग बाजारपेठेत गणपती आरास आणि सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *