Murlidhar Mohol On Pune Flood : पुण्याती पुराला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

Spread the love

Murlidhar Mohol On Pune Flood : पुण्याती पुराला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

ही बातमी पण वाचा

पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजली जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात व जिल्ह्यात आज पावसाने हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे (Rain) सकाळपासूनच पुण्यातील विविध भागांत पाणी साचलं होत, तर काही भागांतील घरांमध्ये नागरिक अडकले होते. या भागात एनडीआरएफ व अग्निशमनच्या जवानांनी धाव घेत नागरिकांना घरातून बाहेर काढले. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या डोळ्यातही पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. कारण, अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून मोठं नुकसानही झालं आहे.  पुण्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला, त्याच पार्श्वभूमीवर आज शाळांना (School) सुट्टी देण्यात आली होती. आता, उद्या 26 जुलै रोजीही पावसाची शक्यता लक्षात घेत पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. 

पुण्यात तब्बल 32 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन, पुणे, पिंपरी चिंचवड  आणि पुणे ग्रामीण परिसरात उद्या शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.ज्याअर्थी, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 जुलै 26 जुलै 2024 रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *