Nagpur News : दीक्षाभूमीवरील अंडरग्राउंड पार्किंग प्रकल्प रद्द; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वीच परिसर होईल पूर्ववत

Nagpur News नागपूर : दीक्षाभूमी (Deekshabhoomi) परिसरात अंडरग्राउंड पार्किंगसाठी खोदलेला अवाढव्य खड्डा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्णपणे बुजवला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विश्वस्तांनी दिली आहे. दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंगचा विषय वादग्रस्त ठरल्यानंतर पार्किंगसाठी खोदलेला खड्डा बुजवण्यात यावा अशी मागणी केली जात होती. त्याच संदर्भात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विश्वस्तानी नुकतच अंडरग्राउंड पार्किंगचे काम करणाऱ्या एनआयटी आणि एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत तो खड्डा बुजवण्याची मागणी केलीय.

एनआयटी आणि एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव शासनाच्या उच्च अधिकार समितीकडे पाठवला होता. पार्किंगसाठी खोदण्यात आलेला परिसर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत समतल केला जाणार असल्याची माहिती समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वी दीक्षाभूमीचा परिसर पूर्ववत होईल, असा विश्वासही गजघाटे यांनी व्यक्त केला आहे.

पार्किंगसाठी खोदण्यात आलेला अवाढव्य खड्डा बुजवणार 

नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंगचा प्रकल्प वादग्रस्त ठरला होता. त्या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी 1 जुलै रोजी बाबासाहेबांच्या हजारो अनुयायांनी आक्रमक आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार आणि दीक्षाभूमीचा व्यवस्थापन सांभाळणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीनेही अंडरग्राउंड पार्किंगचे प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले होते. मात्र, अंडरग्राउंड पार्किंगसाठी दीक्षाभूमीच्या परिसरात खोदलेला अवाढव्य खड्डा तसाच कायम होता. परिणामी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विनंतीनंतर लवकरच खड्डा बुजवण्याची प्रक्रिया सुरू होईल. अशी माहिती आता समोर आली आहे.

समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका

वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना केवळ समाजमाध्यमावरच्या खोट्या अफवा आणि त्या अफवांची कसलीही चौकशी न करता त्यावर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवला. परिणामी त्यातूनच आंदोलनाचा भडका उठल्याचे मत दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले. दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनाआधी अंडरग्राऊण्ड पार्किंगचा नागपूर मेट्रोशी कोणताही संबंध नसताना फक्त अंडर ग्राऊण्ड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी आणलेल्या बॅरिकेट्स वर नागपूर मेट्रो लिहिले होते. त्यामुळं ही पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल, ही अफवा पसरवण्यात काही समाजकंठक यशस्वी झाल्याचे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रदीप आगलावे (Pradeep Aglave) यांनी सांगितले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *