PM Narendra Modi : इंडिया आघाडी ही देशाचे तुकडे तुकडे करतेय : पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : इंडिया आघाडी ही देशाचे तुकडे तुकडे करतेय : पंतप्रधान मोदी
इंडिया आघाडी ही देशाचे तुकडे तुकडे करतेय अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीची प्रचारसभा घेतली. पंतप्रधान मोदींची ही गेल्या तीन दिवसांतली विदर्भातली दुसरी प्रचारसभा. रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया या तीन मतदारसंघातल्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान मोदींनी केला. इंडिया आघाडीवर पंतप्रधानांनी जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने बाबासाहेबांच्या राजकारणाला संपवलं, काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्नपासून वंचित ठेवलं असं पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यात इंडिया आघाडीला एकही जागा मिळू देऊ नका असं ते म्हणाले.