Police Boyz : पोलीसांवर असं वक्तव्य करणं चुकीचं – पोलिस बाॅईज संघटना
Police Boyz : पोलीसांवर असं वक्तव्य करणं चुकीचं – पोलिस बाॅईज संघटना आज भाजपनेते आमदार नितेश राणे ‘बाहुबली हिंदू संमेलना’साठी अकोल्यात येतायेत. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दुपारी 4 वाजता हे संमेलन होणारेय. या संमेलनावर आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवर काल सांगलीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचं सावट आहेय. “पोलिसांनी माज केला तर त्यांना बायकोला फोन जाणार नाही, अशा ठिकाणी बदली करू” अशी धमकी काल नितेश राणे यांनी दिली होतीय. अकोल्यातील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेनं नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध केलाय. नितेश राणे सातत्याने पोलिसांवर बोलत असताना गृहमंत्री गप्प का?, असा प्रश्न पोलिसांच्या पाल्यांनी उपस्थित केलाय. पोलिसांविरोधात वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंसह इतर नेत्यांचं पोलीस संरक्षण सरकारने काढून घेण्याची मागणी करण्यात पोलिसांच्या पाल्यांकडून करण्यात आलीय. नितेश राणे आल्यानंतर नेमकं हे पोलीस बॉईज नेमकं काय पवित्रा घेतात याबद्दल औत्सुक्य निर्माण झालंय. अकोल्यातील पोलीस बॉईजशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी…