Rajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळ
Rajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळ
महायुतीकडून ठाण्याची जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि तिथं कोण उमेदवार असणार हे अजूनही निश्चित झालेलं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेतल्या ठाकरे गटानं यांनी पुन्हा एकदा राजन विचारे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून प्रचार सुरू केला. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्यालाही त्यांनी पुष्पहार अर्पण केला.