Sangli Accident News: सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सांगली: सांगलीच्या तासगाव – मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहाजणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात (Road Accident) झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.

या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त हे सर्वजण कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे

मयत नावे

राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60 

सुजाता राजेंद्र पाटील -वय 55

प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव)

ध्रुवा-  वय 3 वर्ष 

कार्तिकी-  वय 1 वर्ष

राजवी- वय 2 वर्ष

जखमी

स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *