Sindhudurg : आईच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलाला धक्का, रेल्वेखाली उडी घेऊन स्वतःला संपवलं

मुंबई: आपल्याला गंभीर आजार असल्याचं समजताच त्या धक्काने आईचा मृत्यू झाला, तर आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मुलाने स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेला तरूण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  मिठमुंबरी गावचा असून त्याने घाटकोपरमध्ये रेल्वेखाली जीव दिला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मिठमुंबरी-खालचीवाडी येथे सुषमा गावकर यांचा मृत्यू झाला. ही बातमी त्यांच्या मुलाला समजताच त्या धक्क्याने हितेश गावकर या 27 वर्षीय युवकाने घाटकोपर येथील रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली. मायलेकाचे एकाच दिवशी मानासिक धक्यातून निधन झाले. 

सुषमा गावकर यांना गंभीर आजार झाल्याचे समजताच त्यांचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाला होता. हे वृत्त हितेशला समजताच त्यानेही मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली. गावकर कुटुंब मुंबईतील लालबाग येथे छोटा खानावळीचा व्यवसाय करत होते. हा व्यवसाय सांभाळून गावाकडील हापूस आंब्याचा व्यवसाय देखील करत होते. या मायलेकाच्या मृत्यूने मिठमुंबरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *