TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 03 June 2024 : ABP Majha

लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला, निकालांना उरले अवघे २४ तास, मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज

भाजपचा पराभव होणारच, इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल, सामनाच्या अग्रलेखातून दावा

मतमोजणीसाठी स्ट्राँग रूममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका, स्ट्राँग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना

पोस्टल मतदानाचे निकाल हे पहिल्या फेरीच्या निकालाआधीच जाहीर व्हायला हवेत, इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी, मतमोजणी पद्धतीत बदल करण्यास सक्त विरोध
((आता पोस्टल मतदानावरून जुंपणार?))

मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज ठाकरे गटाचे अनिल परब अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित, दुपारी १२ वा. नवी मुंबईत कोकण भवन इथे फॉर्म भरणार

एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोदींना भेटण्याची इच्छा, भेटीसाठी अनेकांना मेसेज, दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा 

लोकसभेचं मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ, आज मध्यरात्रीपासून टोल दरात ३ ते ५ टक्के वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

अमूल दूधाच्या किंमतीत प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ, नवे दर आजपासून लागू, दुधाच्या वाढलेल्या किंमतीमुळे नागरिकांना फटका.

अरूण गवळीच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात सरकारची याचिका, आज सुनावणी, २००६ च्या नियमानुसार गवळीच्या सुटकेला सरकारचं आव्हान

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा. बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. प्रवाशांचा संताप

रेल्वेच्या मेगा ब्लाॅकमध्ये बेस्ट बसची जम्बो कमाई, ३१ मे आणि १ जून या दोन दिवसांत ५ कोटींहून अधिकचा गल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *