Uddhav Thackeray Mumbai Sabha : मोदींना आमची मुलं कडेवर घेऊन जावं लागतात, ठाकरेंनी धू धू धुतलं
कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैशाली दरेकर निवडणूक लढवत असून त्यांना ठिकठिकाणी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱया जाहीर सभेची जय्यत तयारी झाली असून ही सभा विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी ठरेल, असा विश्वास कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी व्यक्त केला आहे. या सभेत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भाषणे होणार आहेत.