100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

अयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, जैश ए मोहम्मदच्या धमकीनंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ

शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना दिलेल्या क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला न्यायालयात आव्हान, २९ जून रोजी सुनावणी

केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायला आवडेल, पत्रकाराच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा जंगी सत्कार

नगरचे खासदार निलेश लंकेंकडून पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेची भेट, सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड, गजा मारणेची पार्श्वभूमी माहित नव्हती, लंकेंची सारवासारव..

सगळंच मनासारखं होत नाही, काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते, राज्यसभेच्या खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांचा नाराजीचा सूर, तर पक्षात कुणीही नाराज नाही, अजितदादांचं स्पष्टीकरण

संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधल्या लेखावर थेट बोलणं अजितदादांनी टाळलं, आता फक्त विधानसभा निवडणुकीवर लक्ष, अजित पवारांचं वक्तव्य

भाजपच्या मराठा आमदारांची बैठक,
१५ दिवसांत आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा, आमदारांची चंद्रकांत पाटलांकडे मागणी, केलेली काम मराठा समाजापर्यंत पोहचवण्याच्या सूचना

१ टक्का मतं वाढवली तरी विधानसभेला मोठा विजय, मंथन बैठकीत फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना, विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचंही आवाहन 

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, रावसाहेब दानवेंना अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर, सिल्लोडचा पाकिस्तान होतोय, दानवेंनी केलं होतं वक्तव्य

वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरुन विश्व हिंदू परिषद नाराज, भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? विहिंपच्या नेत्यांचा सवाल

अहंकारी लोकांना जनतेनं २४१ वर रोखलं, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारांच्या कानपिचक्या, तर आरएसएसनं भाजपचा अहंकार संपवावा, राऊतांचा टोला..

तब्बल १० वर्षांनंतर लोकसभेत काँग्रेसला मिळाली विरोधी पक्षनेतेपदाची संधी… राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीसाठी तयार नसल्याची सूत्रांची माहिती..

आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट, दीड हजार दिंड्यांना मिळणार प्रत्येकी २० हजार रुपयांचा निधी, दौंडमधला प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचाही निर्णय

कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार, पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावर  तोडग्याचे केंद्राचे प्रयत्न

मराठवाड्यात पावसाचं धुमशान, संभाजीनगरच्या गेवराई कुबेर गावात ढगफुटीसदृश पाऊस, वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यातही जोरदार पाऊस

फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली…पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांच्या हाती लागला ऐतिहासिक खजिना…

अमेरिेकेतल्या कॅलिफोर्नियात पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा, २ मिनिटांत २० दरोडेखोरांनी अख्खं दुकान लुटलं, पाच जणांना बेड्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *