Nashik: इस्त्रायल-हमास युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला,युरोपियन देशात जहाजातून होणारी निर्यात थांबवली
Nashik : इस्त्रायल – हमास युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला, युरोपियन देशात जहाजातून होणारी निर्यात थांबवली
इस्रायल आणि हमासमधील युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला बसली असून, महाराष्ट्रातील द्राक्षांच्या निर्यातली सध्या ब्रेक लागलाय. गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळे भारतातून युरोपियन देशात होणारी द्राक्षांची निर्यात जहाज वाहतूक कंपन्यांनी थांबवली आहे. दरम्यान आता नेमकी काय परिस्थिती आहे?, द्राक्ष निर्यातदारांना कसा फटका बसतोय? याबाबत नाशिकचे प्रसिद्ध द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..